|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डीसीपी मॅडमनी घेतली हजेरी, अधिकाऱयांची उडाली भंबेरी

डीसीपी मॅडमनी घेतली हजेरी, अधिकाऱयांची उडाली भंबेरी 

गैरधंदे थोपविण्यासाठी पोलीस अधिकाऱयांचा घेतला क्लास

प्रतिनिधी/ बेळगाव

सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहर व उपनगरात गैरधंदे वाढले आहेत. ‘वरि÷ांकडे’ थेट वशिला वाढल्यामुळे गुन्हेगार माजले आहेत. अनेक ठिकाणी मटका, जुगार व बेकायदा वाळू व्यवसायाला काही पोलीस अधिकाऱयांचेच कृपाछत्र लाभल्याचे दिसून येत आहे. या साऱया प्रकारांवर आळा घालण्यासाठी गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी गुरुवारी अधिकाऱयांची चांगलीच हजेरी घेतली.

मटका, जुगाराचे प्रमाण वाढले आहे. थेट नागरिक तक्रार करू लागले आहेत. प्रसार माध्यमांमध्ये या गैरधंद्यांविषयी माहिती देणाऱया बातम्याही वाढल्या आहेत. तुम्ही अशा गैरप्रकारांवर आळा घालणार की त्यांना पाठिशी घालणार? असा प्रश्न उपस्थित करून शहरातील बहुतेक अधिकाऱयांची त्यांनी झाडाझडती घेतली. बिनतारी यंत्रणेवरील या संभाषणाचा अधिकाऱयांनी चांगलाच धसका घेतला आहे.

20 मटकाबुकींना अटक

तातडीने गैरप्रकारात गुंतलेल्यांवर कारवाई करा अन्यथा जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करावे लागेल, असा इशारा देताच शुक्रवारी दुपारी 4 नंतर पोलीस अधिकारी प्रत्यक्ष कामाला लागले. मटकाबुकींना शोधून त्यांना पोलीस स्थानकात आणण्यात आले व त्यांच्यावर फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत 15 एफआयआर दाखल करून 20 मटकाबुकींना अटक करण्यात आली.

काही अधिकाऱयांच्या हावरेपणामुळे अवैध धंद्यांना ऊत

केवळ पैसा कमविण्याच्या उद्देशाने बेळगावला स्वतःची बदली करून घेऊन आलेल्या काही अधिकाऱयांच्या हावरेपणामुळे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. ‘तुम्ही काही करा, आमच्याकडे जरा बघा’, अशा मनःस्थितीच्या अधिकाऱयांमुळे गुन्हेगार चांगलेच माजले आहेत. काही वरि÷ थेट गुन्हेगारांशीच संपर्क साधून त्यांच्याशी बोलणी करीत आहेत. त्यामुळे कनिष्ट अधिकाऱयांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमुळेच पोलीस यंत्रणा कुचकामी ठरू लागली आहे.

गुरुवारी दुपारनंतर मटकाबुकींविरुद्ध सुरू झालेल्या कारवाईमुळे मटकाबुकींनाही धक्का बसला. काही जणांनी पोलीस दलातील आपल्या गॉडफॉदरशी संपर्क साधून हे काय चालले आहे? हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले. यावर थोडे दिवस पंढरपूरला जा, नंतर बघू, असा सल्ला त्यांना मिळाला. डीसीपी सीमा लाटकर यांनी घेतलेल्या हजेरीमुळे अधिकाऱयांची चांगलीच भंबेरी उडाली.

बेळगाव येथे काही भ्रष्ट अधिकाऱयांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या गैरधंद्यांविषयी वरि÷ पोलीस अधिकाऱयांपर्यंत माहिती पोहोचली आहे. बेळगाव येथील परिस्थिती अशीच राहिल्यास पोलिसांपेक्षा गुन्हेगारच वरचढ ठरणार आहेत. निव्वळ पैसा कमविण्याच्या हेतूने बेळगावात पाऊल ठेवलेल्या काही अधिकाऱयांच्या हावरेपणामुळे चोर शिरजोर ठरु लागले आहेत. याला चाप देण्याचा प्रयत्न डीसीपी सीमा लाटकर यांनी केला आहे.