|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » पोलादपूर अपघातग्रस्तांना मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री

पोलादपूर अपघातग्रस्तांना मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाबळेश्वरजवळील पोलादपूर घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादाययक घटना घडली आहे. अपघातस्थळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थपन यंत्रणा पोहोचली असून सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाबळेश्वर येथील बस अपघातात 33 मृत्यूमुखी पडलेल्या बातमीने मला अतिव दुःख झाले असून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

 

Related posts: