|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षण देणार-मुख्यमंत्री

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षण देणार-मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकार किंवा अन्य कुणीही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठय़ांना आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याची छाननी केली जाईल आणि विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा कायदा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता. परंतु त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, सर्वोच्च न्यायालयानंही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तामिळनाडूचा पॅटर्न राबवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं अभ्यास करून अहवाल सादर करावा. राज्य सरकार मराठय़ांना आरक्षण देण्यात दिरंगाई करत नाही आहे. मागच्या काळात काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या दूर करून पुन्हा आरक्षण देण्याबाबत निर्णय घेऊ. मागासवर्ग आयोगचे अध्यक्ष जस्टिस पाटील साहेबांचं निधन झाल्याने आरक्षणाच्या बाबतीतील अहवालाचे काम थांबले होते. परंतु आता नवीन अध्यक्ष आल्याने ते पुन्हा सुरू झाले आहे. आयोग स्वायत्त आणि स्वतंत्र असल्यामुळे सरकार त्यावर दबाव टाकू शकत नाही. त्या अहवालाच्या आधारवरच कायदा करता येणार आहे. आयोगाने लवकरात लवकर कारवाई पूर्ण करावी, आरक्षणाच्या विरोधात कोणीही नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षीयांचे एकमत झाले आहे. आंदोलनांमध्ये हिंसा देखील झाली. पोलिसांनी हिंसाचार करण्यांवर कारवाई केली आहे. मेघाभरती झाल्यास आम्हाला संधी मिळणार नाही, अशी मराठा तरुणांची भावना आहे. मराठा समाजाचा संभ्रम दूर करून ही भरती करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आंदोलनकर्त्यांनी हा संभ्रम मनातून काढून टाकावा. तसेच आम्ही फीमध्ये सवलत दिली आहे. मराठा मुलांची अडवणूक कोणत्याही कॉलेज किंवा महाविद्यालयानं केल्यास कडक कारवाई केली जाईल. जीआर काढून त्या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: