|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » सरण रचून विष  पिल्याने  शेतकऱयाची आत्महत्या

सरण रचून विष  पिल्याने  शेतकऱयाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :

बुलडाण्यात एका तरुण शेतकऱयाने स्वतःचे सरण रचून, त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्मयातील सावरखेड तेजन गावात ही धक्कादायक घटना घडली. गजानन जायभाये (वय 32 वर्ष) असे मृत शेतकऱयाचं नाव आहे.

 

गजानन जायभाये यांची तीन एकर शेती आहे. मात्र कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे 70 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यात कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना आणखी कर्ज मिळू शकले नाही. या सगळय़ाला कंटाळून गजानन जायभाये यांनी काल रात्री उशिरा (29 जुलै) आपल्या शेतात सरण रचले. त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनीही आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

Related posts: