|Sunday, November 17, 2019
You are here: Home » क्रिडा » मानांकनात नादालचे अग्रस्थान कायम

मानांकनात नादालचे अग्रस्थान कायम 

वृत्तसंस्था/ माद्रीद

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या व्यावसायिक टेनिस संघटनेच्या (एटीपी) ताज्या मानांकनात स्पेनच्या राफेल नादालचे अग्रस्थान शाबूत राहिले आहे. त्याच्या पहिल्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर दुसऱया स्थानावर आहे.

एटीपी ताज्या मानांकन यादीत स्पेनचा नादाल 9310 गुणांसह पहिल्या, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 7080 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह 5665 गुणांसह तिसऱया, अर्जेंटिनाचा डेल पोट्रो 5395 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन 4655 गुणांसह पाचव्या, बल्गेरियाचा डिमिंट्रोव्ह 4610 गुणांसह सहाव्या, क्रोएशियाचा सिलीक 3905 गुणांसह सातव्या, ऑस्ट्रीयाचा थिएम 3665 गुणांसह आठव्या, अमेरिकेचा जॉन इस्नेर 3490 गुणांसह नवव्या आणि सर्बियाचा जोकोव्हिक 3355 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.

Related posts: