|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुर्गा स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा

दुर्गा स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा 

वार्ताहर/ पालये

पार्से येथील श्री दुर्गा इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम मुख्याध्यापक  सुभाष परब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांनिशी साजरा झाला. यावेळी स्कूलचे व्यवस्थापक रामनाथ सावंत, मुख्याध्यापक  सुभाष परब, साहित्यिक तथा शिक्षक हृदयनाथ तांबोस्कर, अन्य शिक्षक, शिक्षकेतरवर्ग, विद्यार्थीवर्ग यांची उपस्थिती होती.

व्यवस्थापक रामनाथ सावंत यांनी दीपप्रज्वलन करून व्यास मुनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकवर्गास पुष्प देऊन गुरुवंदना सादर केली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास अनुसरून नाटिका, भाषणे, गाणी सादर केली. श्री. सावंत यांनी गुरुपौर्णिमेसंबंधी विद्यार्थ्यांना महत्त्व विषद केले. मुख्याध्यापक सुभाष परब यांचेही यावेळी मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मुख्याध्यापक परब यांच्या हस्ते झाले.

सूत्रसंचालन शिक्षिका विणा विजय कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका सुधा इब्रामपूरकर, तेजा पटेकर, पुष्पलता परब यांनी परिश्रम घेतले.

Related posts: