|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » सलग सातव्या सत्रातही बाजारातील तेजी कायम

सलग सातव्या सत्रातही बाजारातील तेजी कायम 

सेन्सेक्स 37,600 वर, निफ्टी 11,350 पातळीवर

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी शेअरबाजारात तेजीचे वातावरण पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारामध्ये चढ उतारानंतर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वधारत एक दमदार उंचीची नोंद करत बाजार बंद झाला. निफ्टी प्रथमच 11 हजार 350 वर पोहोचला होता. तर सेन्सेक्समध्ये 37 हजार 600प् ार्यंत वधारला आहे. दिवसभरात व्यवहारात निफ्टी 11 हजार 366 पर्यंत वधारला होता. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीचे वातावरण राहिले होते. बीएसईचा मिडकॅपचा निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वाढ होऊन बंद झाला. तर निफ्टीचा मिडकॅप 100 अंकावर पोहोचत निर्देशांक 0.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

बीएसईच्या 30 कंपन्याचा शेअर्सचा समभागात मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 112 अंकानी म्हणजेच 0.3 टक्के वाढीसह 37,606 वर पोहोचत बंद झाला. तर दुसरीकडे एनएसईचा 50 मुख्य शेअर्सचा निर्देशांकात निफ्टी 37 अंकानी वाढत 0.3 टक्क्याच्या तेजीसह 11 हजार 356 वर वधारत बंद झाला आहे.

बाजारात आयटी, रियल्टी, औषध, धातू, एफएमसीजी, वाहन, भांडवली वस्तू, तेल आणि वायू यांच्या समभागात खरेदी झाल्याने बाजारात समाधानाचे वातावरण होते. तर दुसरीकडे पीएसयू बँक, फायनान्शियल सेवा आणि माध्यम या समभागात चांगली विक्री झाली. बँक निफ्टीत 0.3 टक्के घसरणीसोबत 27,764 अंकावर बंद झाला. 

टेक महिंद्रा ,रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटो, एचयुएल, अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टील 3.9 ते 1.9 टक्क्यांनी वधारत बंद झालेत. दिग्गज समभागात एक्सिस बँक, इंडियाबुल्स, आयशर मोर्ट्स, एचडीएफसी, बीपीसीएल, एसबीआय, आयटीसी आणि टाटा मोटर्सच्या समभागात 3.4 ते 1.2 टक्क्यांची घसरण नोंदवत बंद झाला.

मिडकॅपच्या समभागात अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ईमामी यामध्ये 7.9 ते 3.9 टक्क्यांची उसळी घेत बंद झालेत. मिडकॅपमधील बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, ब्ल्यू डार्ट आणि आयडीएफसी बँक 8.75 ते 3 टक्क्यांवर अडकत बाजार बंद झाला. तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये काही कंपन्याच्या समभागात मजबूती दिसून आली.