|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » एनआरसीच्या विरोधासाठी आसामला गेलेले 8 तृणमूल नेते एअरपोटवरून ताब्यात

एनआरसीच्या विरोधासाठी आसामला गेलेले 8 तृणमूल नेते एअरपोटवरून ताब्यात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आसाममध्ये नॅशनल सिटीझन रजिस्टर (एनआरसी) चा विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या तृणमूलच्या 6 खासदार आणि 2 आमदारांना गुरुवारी सिलचर एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले. तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी हा सुपर इमर्जन्सी असल्याचे म्हटले आहे. लोकांना भेटणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी एनआरसीच्या मुद्यावर बुधवारी म्हटले की, जर शेजारी राज्य आसाम दुःखी असेल तर बंगालचे लोक का आवाज उठवू शकत नाहीत? ज्यांनी भाजपला मत दिले ते लिस्टमध्ये आहेत, ज्यांनी दिले नाही त्यांना बाहेर काढण्यात आले. बांगलादेशींच्या नावावर अशाप्रकारे लोकांना विभागले जाणार आहे का? विभाजनापूर्वी ते बांगलादेशीही भारतीय नागरीक होते, त्यांची भाषा, संस्कृती आपल्यासारखीच आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) चे वास्तव तपासण्यासाठी एक टीम आसामला पाठवायला हवी. आसाममध्ये एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक रजिस्टरचा मसुदा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 3 कोटी 29 लाख 91 हजार 384 नागरिकांनी अर्ज केला होता. त्यापैकी 2 कोटी 89 लाख 83 हजार 677 नागरिकांच्या नावाचा यादीत समावेश आहे. तर 40 लाख 07 हजार 707 लोकांची नावे यादीत नाहीत. म्हणजेच यांना भारताचे नागरिक समजण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या 40 लाख लोकांबरोबर नेमके काय होणार? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे

Related posts: