|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दलित अधिकाऱयाला पाणी देण्यास नकार

दलित अधिकाऱयाला पाणी देण्यास नकार 

कौशांबी / वृत्तसंस्था :

उत्तरप्रदेशच्या कौशांबी जिल्हय़ात उपमुख्य पशुवैद्यकीय अधिकारी दलित असल्याने पिण्याचे पाणी न देण्याप्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्याचा देखील समावेश आहे.

आपण वरिष्ठांच्या निर्देशानुसार 31 जुलै रोजी विकासकामांची समीक्षा करण्यासाठी अंबावा पूरब गावात गेले होते. तेथे सोबत पाण्याची बाटली नेली होती, परंतु अधिक वेळ थांबावे लागल्याने त्यातील पाणी संपल्याने तेथे उपस्थित पदाधिकाऱयांकडे पाण्याची मागणी केली. पाणी मागून देखील सर्वांनी मी दलित असल्याने पाणी उपलब्ध करण्यास नकार दिल्याचा दावा उपमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा यांनी केला.

अधिकाऱयाने ग्रामस्थांकडे पाणी मागितले असता त्यांना देखील खूण करून मनाई करण्यात आली. डॉक्टर सीमा यांनी याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱयांकडे लेखी तक्रार केली आहे. तर न्यायदंडाधिकाऱयांनी पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी गुन्हा नेंदविण्याचा निर्देश दिला.

यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलत एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. प्रकरणाची चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले.

Related posts: