|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग » जीएसटीमध्ये 14-15 टक्क्यांची करपातळी येण्याची शक्यता

जीएसटीमध्ये 14-15 टक्क्यांची करपातळी येण्याची शक्यता 

डिजिटल देयकावर कॅशबॅक देण्याचा विचार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या जीएसटीमध्ये असणारी 12 आणि 18 टक्क्यांची करपातळी बदलण्याची शक्यता आहे. याऐवजी 14-15 टक्क्यांची नवीन पातळी त्याची जागा घेईल असे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकान्ट्स ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या जीएसटीसंदर्भातील परिषदेमध्ये ते बोलत होते.

जीएसटीमधून मिळणारे प्रति महिन्याचे करसंकलन 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्यावर नवीन करश्रेणीचा विचार करण्यात येईल. मात्र या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून किमान 9 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या जीएसटीमध्ये 0, 5, 12, 18 आणि 28 अशी करपातळी आहे. यातील दोन वगळण्यात आल्यास ती चारवर पोहोचेल. सध्या जीएसटीमधील अनेक वस्तूंवरील करपातळी कमी करण्यात येत आहे. जीएसटी लागू झाल्यापासून एप्रिल या एकाच महिन्यात संकलन 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. सध्या केवळ भारतासह चार देशांमध्ये अनेक करपातळी आहे.

शनिवारी होणाऱया जीएसटी परिषदेमध्ये लहान डिजिटल पेमेन्ट्सवर सवलत देण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेन्ट्समध्ये वाढ करण्यासाठी आणि देयक लवकर मिळण्यासाठी जीएसटीमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. जीएसटी परिषद यासंदर्भात निर्णय घेणार आहे. या प्रस्तावात लहान देयकदारांना 2 टक्के आणि किमान 100 रुपयांपर्यंत सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.

Related posts: