|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » कार विक्रीत होन्डाने टाकले महिंद्राला मागे

कार विक्रीत होन्डाने टाकले महिंद्राला मागे 

नवी दिल्ली

 जपानच्या होन्डा कार्स इंडियाने प्रवासी कार बाजारपेठेत महिंद्रा ऍण्ड महिंद्राला मागे टाकले आहे. जुलै 2018 च्या आकडेवारीनुसार होन्डा देशातील तिसऱया क्रमांकाची कार कंपनी ठरली आहे. ‘अमेझ’ या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळाल्याने कंपनीच्या कार विक्रीत वाढ दिसून आली. होन्डाने जुलै 2018 मध्ये 19,970 युनिट्सची विक्री केली, तर याच कालावधीत महिंद्राच्या विक्रीमध्ये 6 टक्क्यांनी घसरण दिसून आली. कंपनीने 19,781 युनिट्सची विक्री केली.

होन्डा कार इंडियाने यापूर्वी महिंद्रापूर्वी सर्वाधिक कार मार्च 2015 मध्ये विकली होती. त्यावेळी कंपनीकडून देशात 22,696 युनिट्सची विक्री करण्यात आली, तर महिंद्राने 21,030 युनिट्सची विक्री केली. वर्षाच्या आधारे जुलैमध्ये होन्डाच्या विक्रीमध्ये 17 टक्क्यांनी वाढ दिसून आली. कंपनीने गेल्या महिन्यात अमेझ या मॉडेलची 10,180 युनिट्सची विक्री केली असून एकूण विक्रीमध्ये हा हिस्सा 51 टक्के आहे. याव्यतिरिक्त विक्रीच्या बाबतीत सर्वात उत्तम महिना ठरला आहे.

Related posts: