|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांच खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांच खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिलह्यातील किलुरा येथे आज सकाळी सुरक्षा दल आणि अतिरेक्मयांदरम्यान झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाने कंठस्नान घातलेले हे सर्वच्या सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत. सुरक्षा दलाने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून 72 तासांतच 9 अतिरेक्मयांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.

 

किलुरा येथे दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी रात्रीच या परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी दशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याने त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असला तरी किलुरामध्ये दहशतवादी आणि जवानांदरम्यान चकमक सुरूच आहे.