|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वतःच्या विकासासाठी विवेकवाहिनी मुक्त व्यासपीठ

स्वतःच्या विकासासाठी विवेकवाहिनी मुक्त व्यासपीठ 

 प्रतिनिधी/ सातारा

येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात विद्यार्थीनींमध्ये विवेकी विचाराची जोपासना करण्याचा हेतूने कार्यरत असलेल्या विवेकवाहिनी समितीचा उद्घाटक समारंभ साताऱयातील नामवंत बालरोग तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्या म्हणाल्या, चांगल्या शिस्तबध्द आणि नितळ समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रत्येकाने स्वतः मध्ये विवेकी विचाराची जोपासना केली पाहिजे. प्रत्येक घटनेची, का, कसे, कोठे, कशी अशी चिकित्सा करण्याची सवय लावली पाहिजे विचारात परिवर्तन करण्यासंदर्भातील बिजे विद्यार्थी  दशेत रोवली गेली तर आपण आपली शाश्वत स्वरूपाची वैचारिक बैठक तयार करू शकतो. त्यादृष्टीने विवेकवाहीनी हे मुक्त व्यासपीठ महाविद्यालयात उपलब्ध आहे. त्या पुढे म्हणाल्या पथनाटय़, लघुनाटीका, प्रबोधनात्मक सिनेमा दाखवून त्यावर चर्चा, जीवनकौशिल्यावरील तज्ञ मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन, स्वतःला समजून घेताना अशा विद्यार्थी  केंद्रीत कार्यक्रमांच्या आयोजनातून विज्ञानानिष्ठ दृष्टीकोण विकसित होण्यास मदत होते.

विद्यार्थीनींनी सहभागी व्हावे

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अरूण आंधळे यांनी  विद्यार्थीनींच्यातील मुक्त संवाद वाढावा यादृष्टीने विवेकवाहिनी, स्पीक आऊट सेंटर या माध्यमातून महाविद्यालय प्रबोधनाची कास धरीत आहे. विद्यार्थीनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विवेक वाहिनी कमिटीच्या चेअरमन डॉ. प्रभा कदम यांनी प्रास्ताविक तर डॉ. आफळे यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.