|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सैन्याला लवकरच मिळणार 400 तोफा

सैन्याला लवकरच मिळणार 400 तोफा 

चीन तसेच पाकिस्तान सीमेवर होणार तैनात : होवित्झर तोफांची खरेदी

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

 भारतीय सैन्याला सद्यकाळात अत्याधुनिक तोफांची गरज आहे. भारत-पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणाऱया तोफांचा देखील यात समावेश आहे. अत्याधिक उंचीपासून वाळवंट असो किंवा हिमाच्छादित प्रदेशात तैनात करता येणाऱया 400 तोफा सैन्याला लवकरच मिळणार आहेत.

भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होणाऱया या सर्व तोफा मेक इन इंडियांतर्गत निर्माण केल्या जात आहेत. भारतीय सैन्याला 145 तोफा मिळाव्यात याकरता प्रकियेत गतिमानता आणण्याची सूचना करण्यात आली आहे. मे 2018 मध्ये धनुष्य 155/45 कॅलिबरच्या तोफेची पोखरण येथे चाचणी पार पडली आहे. 114 तोफा लवकरच सैन्याला सोपविण्यात याव्यात, असे ऑर्डिनेन्स फॅक्ट्री बोर्डाला सांगण्यात आले आहे.

के-9 वज्र 155 एमएम/52 कॅलिबरची होवित्झर शेणीतील 100 तोफांची निर्मिती दक्षिण कोरियात केली जाणार असून त्या देखील सैन्याला लवकरच मिळतील. यातील पहिल्या 10 तोफा नोव्हेंबर महिन्यात, तर 40 तोफा पुढील वर्षी आणि 2020 पर्यंत उर्वरित 50 तोफा भारतीय सैन्याला मिळणार आहेत.

अमेरिकेसोबत अत्यंत कमी वजनाच्या 145 होवित्झर तोफांच्या एम777 करारानंतर दोन तोफा भारताला मिळाल्या आहेत. तर मार्च 2019 पासून जून 2021 या कालावधीत दर महिन्याला प्रत्येकी 5 तोफा भारतात दाखल होतील. अल्ट्रालाइट होवित्झर तोफा चीनला लागून असलेल्या सीमेनजीक आणि अरुणाचल प्रदेश तसेच लडाखच्या उंचीवरील क्षेत्रांमध्ये तैनात केल्या जाणार आहेत.

Related posts: