|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बलात्कार, हत्येप्रकरणी पाकच्या गुन्हेगाराला 12 वेळा मृत्यूदंड

बलात्कार, हत्येप्रकरणी पाकच्या गुन्हेगाराला 12 वेळा मृत्यूदंड 

लाहोर

 विशेष न्यायालयाने पाकिस्तानच्या कसूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार तसेच तिच्या हत्येच्या प्रकरणी दोषीला 12 वेळा मृत्यूदंड ठोठावला आहे. दोषीने आणखीन 3 मुलींचे लैंगिक शोषण केले होते. इम्रान अली या दोषीला 7 वर्षीय मुलीवर बलात्कार तसेच तिच्या हत्येप्रकरणी फेब्रुवारी महिन्यातच 4 वेळा मृत्यूदंड, जन्मठेपेची एक शिक्षा, 7 वर्षांची कैद आणि 41 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दोषीने किमान 8 अन्य मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य केले होते. या प्रकरणी न्यायालयाने तुरुंगात मृत्यूदंडाची प्रतीक्षा करणाऱया इम्रानला 12 वेळा मृत्यूदंड ठोठावला आहे. याचबरोबर त्याच्यावर 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील 30 लाख रुपये मृतांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्देश देण्यात आला आहे. कसूरमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच तिच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानात संताप पसरून उग्र निदर्शने झाली होती.

Related posts: