|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओसामा बिन लादेनच्या मुलाचा दहशतवाद्याच्या मुलीशी विवाह

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा दहशतवाद्याच्या मुलीशी विवाह 

9/11 च्या विमान अपहरणकर्त्याची मुलगी

रियाध

अल-कायदाचा म्होरक्या राहिलेल्या ओसामा बिन लादेनचा पुत्र हमजा बिन लादेनने विवाह केला आहे. 9/11 दहशतवादी हल्ल्यासाठी विमानाचे अपहरण करणाऱया मोहम्मद अट्टाच्या मुलीसोबत त्याचा विवाह झाल्याची पुष्टी लादेनच्या कुटुंबीयांना दिली.

ओसामा बिन लादेनच्या सावत्र भावांनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत या विवाहाचा उल्लेख केला. हमजाला अल-कायदात महत्त्वाचे पद मिळाले असून तो स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती अहमद आणि हसन अल-अत्तास यांनी दिली. 7 वर्षांपूर्वी अमेरिपेने पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.

हमजा हा ओसामाच्या तीन जिवंत पत्नींपैकी एकीचा मुलगा आहे. त्याने मोहम्मद अट्टाच्या मुलीसोबत विवाह केला असून हा सोहळा अफगाणिस्तानात पार पडला असावा. हमजाची पत्नी इजिप्तची नागरिक असावी, अशी शक्यता लादेनच्या दोन्ही भावांनी वर्तविली आहे.

लादेनच्या मृत्यूपूर्वी त्याच्या पत्नी आणि मुले सौदी अरेबियाला परतले होते, तेथे त्यांना माजी युवराज मोहम्मद बिन नायेफ यांनी आश्रय दिला होता. ओसामाच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांनी लादेनची आई आलिया घानेमशी संपर्क राखला होता.