|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवण्याची सरकारची ग्वाही

मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवण्याची सरकारची ग्वाही 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्याचे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. तसेच 10 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकराने काम पूर्ण केल्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. याप्रकरणातील पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.

ऍड. ओवीस पेचकर यांनी हायकोर्टात मुंबई-गोवा महामार्गावरील खडय़ांविरोधात याचिका दाखल केली आहे. महामार्गावरील 471 किमी लांबीच्या महामार्गावरील पहिल्या 84 किमीचा टप्पा हायवे प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे, तर नंतरचा 387 किमीचा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार अशी ग्वाही राज्य सरकारकडून हायकोर्टात दिली होती. मात्र राज्य सरकारचा हा दावा फोल असल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितले होते. तसेच खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे मटेरीयल हे निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याने रस्त्याचे अधिक नुकसान होते असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला होता. राष्ट्रीय महामार्गावरील खडय़ांसंदर्भात याचिका दाखल करण्याची वेळच का येते? केवळ गणेशोत्सवच का? वर्षभर कोकणातून ये-जा करणाऱयांनी खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करत रहायचा का? असे म्हणत मॉन्सूनदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ही समस्या दरवषीसाठी ठरलेली आहे, यावर काहीतरी कायमचा उपाय करण्याचे निर्देश याआगोदर हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते.

Related posts: