|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » ओबीसींची जागा दुसऱया समाजाला देणार नाही : देवेंद्र फडणवीस

ओबीसींची जागा दुसऱया समाजाला देणार नाही : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकारी नोकरीत ओबीसी समाजाला किती प्रतिनिधित्व मिळाले याचा आढावा घेतला जाईल. ओबीसी समाजाच्या रिक्त जागा असतील तर त्या जागा कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील,तसेच ओबीसींची एकही जागा दुसऱया समाजाला देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसींची एकही जागा दुसऱया समाजाला देणार नाही, त्या जागी ओबीसी उमेदवारांचीच भरती केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने एनएससीए सभागृहात तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विजय, वडेट्टीवार, परिणय फुके आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी आपले सरकार कटीबद्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी भरतीतील ओबीसी समाजाचा अनुशेष भरून काढला जाईल. ओबीसी समाजाची क्रिमिलेयर मर्यादा काढता येइल का, याचा अभ्यास करण्याची विनंती ओबीसी आयोगाला करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.