|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » फ्लिपकार्ट-वॉलमार्टच्या भागिदारीला सीसीआयची मंजुरी

फ्लिपकार्ट-वॉलमार्टच्या भागिदारीला सीसीआयची मंजुरी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या कंपन्यांच्या भागिदारीला तीन महिन्याच्या कालावधीनंतर प्रतिसस्पर्धी आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यात वॉलमार्टकडून 16 अब्ज डॉलर्सचा व्यवहार करुन 77 टक्क्यांची भागिदारी फ्लिपकार्टला देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती.

फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्ताविक भागिदारी खरेदी करण्यास सहमती देण्यात आली आहे.  या व्यवहाराला तीन महिन्यांनी मान्याता मिळाली आसली तरी यात कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स (सीएआयटी) यांच्याकडून 12 पानांचा अहवाला तयार करुन न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येणार असल्याचे या दरम्यान सांगण्यात आले आहे.

सीसीआय च्या तीन सदस्यांनी आपल्या 12 पानांचा अहवाल ऑनलाईन माध्यमातून जादा सवलत लागू केल्या जातात यातून या मंडळाने चिंता व्यक्त करण्यात आली होती. परंतु या भागिदारीला मान्यता देण्यास नकार देण योग्य नसल्याचे मत या तीन सदस्यीय मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यापारी संघटना न्यायालयात जाणार

व्यापारी संघटना या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहेत. यात देशातील सर्व व्यापारी वर्गाकडून 19 ऑगस्टला बैठक घेणार आहेत. यातून आंदोलन करण्याचे का न्यायालयात या निर्णया विरोधात न्याय मागायाचा असा विचार केला जाणार असल्याचे व्यापारी संघटनेचे सचिव प्रवीण खंडेवाल यांनी सांगितले आहे.

Related posts: