|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » नादाल, वावरिंका पुढील फेरीत

नादाल, वावरिंका पुढील फेरीत 

वृत्तसंस्था /माँट्रीयल :

स्पेनचा टॉप सीडेड राफेल नादाल तसेच स्वित्झर्लंडचा वावरिंका, सर्बियाचा जोकोव्हिक यांनी येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील रॉजर्स चषक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

या स्पर्धेत बुधवारी पावसामुळे उशिरा खेळविण्यात आलेल्या दुसऱया फेरीच्या सामन्यात स्पेनच्या नादालने फ्रान्सच्या बेनोई पेरीचा 6-2, 6-3 असा 74 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. नादाल आणि स्वित्झर्लंडचा वावरिंका यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. वावरिंकाने दुसऱया फेरीतील सामन्यात हंगेरीच्या फ्युसोविक्सचा 1-6, 7-6 (7-2), 7-6 (10-7) असा पराभव केला. सर्बियाच्या जोकोव्हिकने कॅनडाच्या पोलेनस्कायवर 6-3, 6-4 अशी मात केली. नवव्या मानांकित जोकोव्हिकने यापूर्वी ही स्पर्धा चारवेळा जिंकली आहे. ग्रीसच्या सिटसिपेसने ऑस्ट्रीयाच्या थिएमवर 6-3, 7-6 (8-6) अशी मात केली. जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने क्लेहॅनचा 6-4, 6-4 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन, बल्गेरियाचा डिमिंट्रोव्ह, क्रोएशियाचा सिलीक, अमेरिकेचा इस्नेर, हॉलंडचा रॉबिन हॅस, रशियाचा कॅचेनोव्ह यांनी या स्पर्धेत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला आहे. कॅचेनोव्हने दुसऱया फेरीतील सामन्यात स्पेनच्या बुस्टोचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला.

 

Related posts: