|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

अथणी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव 

वार्ताहर/ अथणी

अथणी नगरपालिका नगराध्यक्षांनी सामान्य सभा न बोलावल्याने काँग्रेस-जेडीएसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष प्रकाश बजंत्री यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. शुक्रवारी उपनगराध्यक्षा शैला हळदमल यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य सभा बोलावली होती. या सभेला नगराध्यक्षांसह भाजपचे 10 नगरसेवक गैरहजर राहिले. यावेळी काँग्रेस-जेडीएसच्या 13 नगरसेवकांनी हात वर करून नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला.

नगराध्यक्षांनी सामान्य सभा न बोलावल्यामुळे अथणी शहराचा विकास खुंटल्याचा आरोप 13 नगरसेवकांनी केला होता. यामुळे उपनगराध्यक्षा शैला हळदमल यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठराव मांडण्यात आल्याचे नगरसेवक रावसाहेब ऐवाळे व सलाम कल्ली यांनी पत्रकारांना सांगितले.

अथणी नगरपालिकेवर अनेक वर्षापासून भाजपची सत्ता होती. सत्ता स्थापन करताना काँग्रेसच्या काही नगरसेवकांना हाताशी धरून भाजपने सत्ता काबीज केली. परंतु शहराचा विकास थांबल्याने काँग्रेस-जेडीएसच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव मांडला. हा ठराव जिल्हाधिकाऱयांकडे पाठवून देण्यात येणार असल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी महांतेश कवलापूर यांनी सांगितले. 

Related posts: