|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » वैभव राऊतच्या अटकेनंतर पुण्यातून आणखी दोघे ताब्यात

वैभव राऊतच्या अटकेनंतर पुण्यातून आणखी दोघे ताब्यात 

ऑनलाईन टीम / पुणे :

नालासोपाऱयातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी अजून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातून या तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे.

 

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून 20 गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.अटक झालेल्या आरोपींनी स्वतः टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले आहे. आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना 18 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे.