|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » शरद पवारांना डोके नावाचा प्रकारच नाही-उद्धव ठाकरे

शरद पवारांना डोके नावाचा प्रकारच नाही-उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पगडय़ांचे राजकारण करणाऱया शरद पवारांकडे डाके नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पुणेरी पगडी नाकारून पागोटय़ाला पसंती देण्याची शरद पवारांची कृती अतिशय चर्चेत राहिली. यावरुन उद्धव ठाकरेंनी पवारांवर शरसंधान साधले. पगडय़ांचे राजकारण करू नका, असा सल्ला यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ये÷ नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी परिधान करण्यात येत होती. त्यावेळी शरद पवार मंचावर उपस्थित होते. भुजबळांना पुणेरी पगडी परिधान करणाऱया व्यासपीठावरील मान्यवरांना पवारांनी रोखले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील कार्यक्रमांमध्ये पागोटेच वापरले जाईल, अशी घोषणा त्यावेळ मंचावरुन केली होती. पवारांच्या या सांकेतिक राजकारणावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. ‘पगडय़ांपेक्षा त्या परिधान करणाऱया व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवे. लोकमान्य टिळकांनी ‘इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. पवारांना तोदेखील प्रश्न विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागतं. पवारांना डोके नावाचा प्रकारही नाही,’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. सध्या देशातील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना अघोषित आणीबाणीचा सामना करावा लागत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. दुसरी आणीबाणी येत आहे, ती मोडून काढा, असे आवाहन त्यांनी केले. जुमलेबाजीने आपला घात केलाय, असेही ते म्हणाले. ‘मोदी सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे. मोदींच्या दाव्याची पडताळणी करून सत्य समोर आणणाऱया पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला जात आहे,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे बरसले.

Related posts: