|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बोरी भागात सात म्हशींचा गूढ मृत्यू

बोरी भागात सात म्हशींचा गूढ मृत्यू 

वार्ताहर/ बोरी

देऊळवाडा बोरी भागात आठवडय़ाभरात सात म्हशी गूढरित्या दगावण्याच्या घटनेमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. विषबाधेमुळे किंवा मुद्दामहून या म्हशींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय शेतकऱयांनी व्यक्त केला आहे.

दगावलेल्या म्हशी रामेश्वरी नाईक, राजू नाईक, नमू नाईक व इतर शेतकऱयांच्या मालकीच्या असून आठवडय़ाभरात सातहून अधिक म्हशींचा गूढरित्या मृत्यू झालेला आहे. दुभत्या म्हशी अशाप्रकारे दगावल्यामुळे शेतकऱयांना आर्थिक फटका बसलेला आहे. हट्टय़ाकट्टय़ा म्हशी अचानकपणे आजारी पडल्याने काही शेतकऱयांनी पशूवैद्यांना आणून उपचार केले. पशुवैद्यांच्या तपासणीनंतर या म्हशींना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती शेतकऱयांनी दिली.

एक म्हैस विकत घेऊन दूध व्यवसाय करायचा असल्यास किमान तीस हजार रुपये मोजावे लागतात. त्यात अशा प्राण्यांच्या पालनपोषणावरही वेगळा खर्च करावा लागतो. अचानकपणे दगावलेल्या या म्हशीमुळे  शेतकऱयांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नाहीसा झालेला आहे. यापैकी काही गरीब शेतकऱयांना पुन्हा म्हशी विकत घेऊन दूध व्यावसाय करणे शक्य नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळावी व या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी प्राणिमित्र आशय कोरडे यांनी केली आहे.

Related posts: