|Saturday, March 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » केरळमध्ये वादळी पावसामुळे ‘त्राहि भगवान’

केरळमध्ये वादळी पावसामुळे ‘त्राहि भगवान’ 

मृतांची संख्या 39, 10 जिल्ह्य़ांमधील जनजीवन ठप्प

वृत्तसंस्था \ थिरूवनंतपुरम

 प्रचंड वादळी पाऊस, ओसंडून वाहणाऱया नद्या आणि नाले, तसेच दरडी कोसळण्याचे सत्र यामुळे गेले आठ दिवस केरळमध्ये हाहाकार उडाला आहे. निसर्गाच्या या प्रकोपात 39 जणांचा बळी गेला असून त्यात काही बालकांचाही समावेश आहे. 10 जिल्हय़ांमधील जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे.

राज्य सरकारने ओनम महोत्सवानिमित्त आयोजित केले जाणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यक्रम दरवर्षी साजरे पेले जातात. इडुक्की धरणातील पाणी बांधावरून वाहू लागले आहे. गेल्या चोवीस तासात पावसाचा धडाका कमी झाला असला तरी कित्येक नद्यांमधील पाणी अद्याप न ओसरल्याने पुराचा धोका टळलेला नाही, असे प्रशासनाने घोषित केले आहे.

मंगळवारी पलक्कड जिल्हय़ातील ओट्टापालम भागात 13 सेंटीमीटर तर इडुक्की जिल्हय़ाच्या मुन्नार भागात 12 सेंटीमीटर पाऊस पडला आहे. तो गेल्या 30 वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात आले. राज्यभरात 20 हजार घरे पूर्णतः नष्ट झाली असून आणखी साधारण एक लाख घरांची पडझड झाली आहे. एकंदर साधारण 1 लाख लोक विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी आसरा शोधावा लागत आहे.

दरड कोसळल्याच्या घटनांची संख्या 215 असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 10 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. या रस्त्यांची दुरूस्ती होण्यासाठी किमान सहा महिने लागतील अशी शक्यता आहे. किमान 2 हजार मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

Related posts: