|Sunday, September 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ह्रदयी स्वयंभची असे

ह्रदयी स्वयंभची असे 

साधारणपणे आपण सारेच स्वत:ला धार्मिक समजतो. रोज अंघोळ करतो, पूजा-पाठ करतो, व्रत-उपवास करतो, म्हणजे आपण धार्मिक आहोत असे आपणास वाटत असते. हे सारे अगदी सवयीचेच होऊन जाते. पण सवय स्वभाव काही होत नाही. हे सारे करताना स्वत:शी संवाद करतो का? ‘हे मी करत नव्हतो तेव्हाचा मी आणि वर्षानुवर्षे हे सारे करणारा मी यात काही फरक आहे का?’ असा प्रश्न आपल्याला कधी पडतो का? मला तरी कधी पडला नव्हता. पण एकदा एक सज्जन भेटले आणि त्यांनी माझे डोळे उघडले. काय केले त्यांनी? सांगतो….

  ‘धार्मिकतेचे म्हणून तू जे करतोस त्याने तुझ्यात काही बदल झाला आहे असे तुला वाटते का?’ त्यांनी मला विचारले. मी काही बोलणार तेवढय़ात ते म्हणाले, ‘थांब, घाईने उत्तर देऊ नको. विचार कर. विचार करायला उपयोगी पडणारे काही मुद्दे देतो. राग कमी झाला? भय कमी झाले? अपेक्षा कमी झाल्या? अहंकार कमी झाला?’ विचार करू लागलो तसे मला कळत गेले की त्यांच्या सगळय़ा प्रश्नांचे एकच उत्तर आहे. ‘नाही, असे फारसे झाले नाही!’ मला वाटले की माझ्या धार्मिकतेला काही अर्थच नाही. ते म्हणाले, ‘तू करतोस त्याला अर्थ नाही असे समजू नकोस. तू जे करतोस ते कशासाठी करतोस याचा तू कधी विचारच केला नाहीस. तूच नाही; स्वत:ला धार्मिक समजणाऱया बहुतेकांनी तो केलेला नसतो. चल, मिळून विचार करू. एकमेकांशी संवाद करू. नंतर स्वत:शीही बोलू !’

   माझ्या लक्षात आले की मी जे देवा-धर्माचे करतो ते सवयीने करतो. मला वाटते की हे केल्याने देवाची आपल्यावर कृपा होईल. सुख मिळेल. यश मिळेल. पण देवाची कृपा म्हणजे तरी काय? ते सज्जन हसून म्हणाले, ‘देवाची कृपा म्हणजे तुला पाहिजे ते त्याने देणे, होय ना? आपण इथेच फसतो. अरे, त्याची कृपा असतेच. एकुलता एक मुलगा वडिलांच्या संपत्तीचा हक्कदार असतोच ना? म्हणून मिसरुड फुटले की लगेच त्याला हक्क मिळत नाही. वारशासाठी पात्र व्हावे लागते. तसेच दैवी संपत्तीचा वारस होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून हे सारे करायचे! कसे होतो पात्र? तर अपेक्षा सोडून.. क्रोध सोडून. भय सोडून. मी रोज थोडा थोडा पात्र झालो पाहिजे. म्हणजे शुद्ध झालो पाहिजे. माझ्यात बदल होतो आहे हे प्रथम मलाच कळते. कळायला पाहिजे. हे आत्मचिंतन झाले नाही तर आहोत तिथेच राहू. ‘कदमताल …लेफ्ट-राईट करत एकाच जागी उभा असणारा कुणी कधी कुठे जाऊन पोचलाय का? पुढे जाणे हीच तर खरी धार्मिकता आहे, मित्रा!’

   हे असे मी प्रथमच ऐकत होतो. आजवर मी कदमतालच तर करत होतो. पण होतो जिथल्या तिथेच ! एका सज्जनाशी केलेल्या संवादाने माझे डोळे उघडले. डोळे उघडले म्हणजे जिज्ञासा जागृत झाली. स्वत:शी संवाद सुरू झाला आणि अध्यात्माच्या (धार्मिकतेच्या म्हणूया फारतर!) चार पायऱया मला दिसू लागल्या. रोजची अंघोळ, पूजा-पाठ, जप-जाप्य, व्रते-उपवास सारे सोडून देण्याची आवश्यकता नाही. पण ती पहिली पायरी आहे. हिला ‘अनुशासनाची’ पायरी म्हणूयात. छान असते अनुशासन! कधीही उठा, काहीही खा, कसेही राहा अशा धरबंध नसलेल्या जगण्यात सुंदरता नसते. आनंद नसतो. मोकाटपण असले तरी मुक्तता नसते. नियमबद्धतेने जगणे सुंदर तर होतेच पण ऊर्जेचे नेटके नियोजनही होते. दिवसाला दिशा मिळते. ज्याला दिशा मिळाली त्याला दिव्यत्व मिळण्याची शक्मयता असते! दिशा लाख मिळाली; पण पाऊलच पुढे टाकले नाही तर? दिशा मिळाली; पण ती उन्नत्तीकडेच जाते याची खात्री नसेल तर? या दोन्ही ‘तर’ ना तारणारी दुसरी पायरीही आहेच ना! कोणती दुसरी पायरी? अनुशासनानंतर येते अनुसरण! अनुकरणही म्हटले तरी चालेल. पण अनुसरण हा नेमका शब्द आहे. पूजा-पाठादिकाने आलेल्या वृत्तीतल्या सात्विकतेचे, शांतीचे दिवसभरातील व्यवहारात अनुसरण व्हायला पाहिजे. माझे प्रत्येक कर्मच पूजा व्हायला हवे. हे झाले एक अनुसरण आणि ही जीवन साधना ज्यांना खरेच साधली; त्यांच्या आचार-विचारांचेही अनुसरण करायला पाहिजे. अनुशासनाने निर्माण झालेल्या ऊर्जेचा जगण्यात वापर करता येणे हेच अनुसरण! ही चालण्याची सुरुवात आहे. ‘चरैवेति’ या मंत्रात हेच अपेक्षित आहे. पण एवढय़ानेही भागत नाही बरे का! नाही तर चालतच राहू. थांबायचे जसे नाही तसे चालतच राहायचे नाही. जगणे ‘खेपा’ नाही, यात्रा बनवायचे! इथे तिसरी पायरी येते.

  अनुशासन, अनुसरणानंतर येणारी ही पायरी ‘अनुभूती’ची आहे. बद्धतेतून अनुशासन आपल्याला बाहेर काढून मुमुक्षु बनवते. अनुसरण मुमुक्षुला साधक बनवते. तर अनुभूती साधकाला सिद्ध बनवते. सिद्धी प्राप्त करून देते. हवेतून वस्तू काढण्याची किंवा भूत-भविष्य सांगण्याची सिद्धी नव्हे; स्वरुप ओळखण्याची! सारेच हरिरूप दिसण्याची! ‘नर-नारी हरिरूप । दिसो बाहेर अंतरी ।।’ या अवस्थेची! अनुभूतीची ही पायरी आपल्याला खरा माणूस बनवते. निर्भय. निर्भेळ. निराभिमानी. कुणी परके उरतच नाही. ‘किंबहुना चराचर । आपणची जाला ।।’ ही अनुभूती. अशावेळी स्वत:शीच केलेला संवाद आपसुक चराचराशी होतो. ही सामरस्याची अवस्था शब्दात कशी सांगावी? काही सायास न करता ‘ये ह्रदयीचे ते ह्रदयी’ पोचते. सारे भेद, साऱया शंका, सारे संशय विसर्जित होतात आणि मोठे गोड आवरण पांघरले जाते. पण हेही मुक्कामाचे ठिकाण नाही. मग दिसते चवथी पायरी… आत्मार्पणाची!

    अनुभूतीतही ती घेणारा थोडा शिल्लक राहतोच. हेही नकोच उरायला. `Deeveboe®es [esner Deevebo lejbie ~ Deevebo®eer Debie Deeveboe®es ~~’ ही स्थिती म्हणजे आत्मार्पण! आत्मनिवेदन!! मग कळते की ‘गुळ-खोबऱयाचा’ नैवेद्य ही सुरुवात होती. नैवेद्य म्हणजेच निवेदन. कुठल्या पदार्थ-पक्वान्नाचा नैवेद्य नाही तर स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा नैवेद्य… अध्यात्म म्हणजे विसर्जित होणे. विसर्जन म्हणजे विशेष सर्जन.. असे सर्जन की ज्यात नाहीसे होणे नसतेच. फक्त असणेच असते. केवढी अथांगता आहे या प्रवासात आणि मी तर जागच्या जागीच उभा राहून पाय हलवत होतो. ‘त्या’ सज्जनाची भेट झाली आणि `Pe[Pe[esefve Jeeefnuee efveIe ~ ³ee YeefkeÌleef®e³ee Jeeìs ueeie ~~’ हे कळाले. तुम्हाला भेटायचेय् त्या सज्जनास? डोळे मिटा, आत बघा. तो तर `Ûo³eer mJe³ebYe®eer Demes ~’ वेळ काढून संवाद कराल ना त्यांच्याशी ? कराच !