|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » कसोटी संघात पंतला संधी द्यावी : वेंगसरकर

कसोटी संघात पंतला संधी द्यावी : वेंगसरकर 

वृत्तसंस्था /लंडन :

येत्या शनिवारपासून ट्रेंटब्रीज येथे सुरू होणाऱया इंग्लंड विरूद्धच्या तिसऱया कसोटीत यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला अंतिम अकरा खेळाडूंत संधी द्यावी, असे आवाहन भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी केले आहे.

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत कोहलीच्या भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. लॉर्डस् आणि एजबेस्टन येथील कसोटी सामने यजमान इंग्लंडन तीन दिवसांच्या कालावधीत जिंकल्या. आता इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर भारतीय संघाची फलंदाजी निस्तेज झाल्याचे जाणवले. कोहली वगळता भारतीय संघातील इतर फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ टिकता आले नाही. या मालिकेत एकतर्फी पराभव टाळण्यासाठी भारतीय संघाची धडपड चालू आहे. विद्यमान कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आगमन केले. त्यावेळी कर्नल वेंगसरकर हे निवड समितीचे अध्यक्ष होते. चिकाटी, संयम यांच्या जोरावर धावा जमविण्यासाठी भारतीय फलंदाजांना स्वत:ची मानसिकता तयार करावी लागेल, असे वेंगसरकर यांनी बीबीसी नभोवाणीशी बोलताना म्हटले आहे. अँडरसन, ब्रॉड यांच्या गोलंदाजीला खेळपट्टी आणि हवामान यांची साथ अधिक मिळत आहे. दरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडच्या तुलनेत अधिक परिणामकारक ठरत नाहीत. इंग्लंडच्या गोलंदाजांचा आदर करावा लागेल, असेही ते म्हणाले. तिसऱया कसोटीत पंतला कसोटी पदार्पणाची संधी द्यावी, असे आवाहन वेंगसरकर यांनी केली आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक पहिल्या दोन कसोटीत चांगली फलंदाजी करता आली नाही त्यामुळे तो आपल्या निवडीला न्याय देवू शकला नाही, असेही वेंगसरकर यांनी शेवटी म्हटले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने पंतला तिसऱया कसोटीत खेळविण्याचे मत व्यक्त केले होते.