|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ट्रम्प सरकार विरुद्ध प्रसार माध्यमे

ट्रम्प सरकार विरुद्ध प्रसार माध्यमे 

पत्रकारितेवर आधारित प्रसार माध्यमांना ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ मानले जाते. त्याचे प्रमुख कारण असे की ही प्रसार माध्यमे जनता आणि सरकार यांच्यातील परस्पर संबंधांचे नेमके स्वरुप, या संबंधातील साऱया पैलू आणि कंगोऱयावर थेट प्रकाश टाकत थेटपणे दर्शवित असतात. वृत्त व प्रसारमाध्यमानी तटस्थ, निःपक्षपाती पद्धतीने जे दिसते ते लोकांपुढे आणले पाहिजे असाही संकेत आहे आणि बहुसंख्य वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे तो पाळतानाही दिसतात. सरकारच्या ताटाखालील मांजर बनण्यात धन्यता मानणाऱया वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांचा अपवाद वगळल्यास बऱयाच प्रमाणात या माध्यमांनी लोकांच्या बाजूने उभे रहावयास हवे हे तत्त्व या क्षेत्रात अबाधित आहे. स्वाभाविकच लोकशाही देशात ही माध्यमे लोकास आधारभूत व दिलासाजनक वाटत असतात.

तथापि, लोकशाही देशात हे देखील दिसून येते की, सरकारमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्यांचे आणि प्रसार माध्यमांचे फारसे पटत नाही. केवळ निवडक प्रसार माध्यमांना मुलाखती देणे, विरोधी सूर आळवणाऱया माध्यमांना त्रांगडय़ात, दाव्यात अडकविण्याचा प्रयत्न करणे, महत्त्वपूर्ण सरकारी माहितीबाबत पक्षपात करणे, माध्यमांवर नियंत्रण लादण्याचे भय दाखविणे या जगभरातील लोकशाही देशात घडणाऱया प्रक्रियातून हे द्वंद्व अधोरेखित होते. अशी भूमिका घेणाऱया अध्यक्षांची, पंतप्रधानांची व पर्यायाने सरकारची ही मानसिकता असते की, देशाचे भले कशात आहे याचा साक्षात्कार केवळ आपणास झाला आहे. या साक्षात्कारास मतदानातून जनतेचा पाठिंबा आहे. अशा स्थितीत प्रसारमाध्यमानी आपल्या प्रत्येक भूमिकेची, धोरणांची, कृतीची सकारात्मक नोंद घ्यावी, प्रशंसा करावी. किमान गप्प तरी बसावे. मात्र राष्ट्रप्रमुख व त्यांच्या सरकारची जरी अशी मानसिकता असली तरी पत्रकारितेचे तत्त्व जपणाऱया प्रसार माध्यमांची कृती तिला अनुकूल असतेच असे नाही. किंबहुना ती प्रतिकूलच असते. जनमानस आणि जनमत घडवणाऱया माध्यमांकडून टीकात्मक, विपरीत असा प्रतिसाद मिळू लागताच सत्ताधारी बिथरतात आणि मग विविध प्रकारे माध्यमांवर घसरतात. अलीकडेच्या काळात हळूहळू हे चित्र सार्वत्रिक होऊ लागले आहे.

अमेरिकेत सद्या वृत्तपत्र स्वातंत्र्य विरुद्ध अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या संघर्षाने वातावरण तापले आहे. वृत्तपत्रिय स्वातंत्र्याची थोर अमेरिकन परंपरा यामुळे भीतीच्या छायेखाली येते आहे अशी शंका जाणत्या पत्रकारांवरून व्यक्त होताना दिसते. याचे एकमेव कारण म्हणजे पत्रकारिता व वृत्तपत्रांच्या बाबतीतील ट्रम्प यांचा आगळा वेगळा दृष्टीकोन व पवित्रा. अलीकडील काळात वृत्तपत्रे व अन्य प्रसार माध्यमांबाबत ‘फेक न्यूज, फेक स्टोरीज, फेक मीडिया, फेक पोल अशी मुक्तकंठानी उधळण करताना प्रसार माध्यमांबाबत ‘फेक’ (खोटी) हा शब्द त्यांनी 400 हून अधिकवेळा वापरला आहे. याशिवाय ‘उघडपणे किळसवाणे’, ‘धोकादायक आणि रोगट’, ‘युद्धाचे कारण बनणारी’, ‘अ2ामेरिकन लोकांची शत्रू’ या उपमाही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिल्या आहेत. याही पुढे जाऊन पत्रकारांच्या बाबतीत ‘मानवतेचे निकृष्ट रूप’ असे वर्णनही त्यांनी केले आहे. विशेषतः सीएनएन, द न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, एमएसएनबीसी ही प्रसार माध्यमे ट्रम्प यांनी लक्ष्य बनवली आहेत. या माध्यमांच्या प्रतिनिधीना भर लोकात अपमानित करणे, त्यांच्याशी द्वेषपूर्ण वर्तणूक करणे हे टॅम्प सातत्याने करीत आहेतच शिवाय अलीकडेच सीएनएनच्या वार्ताहराला व्हाईट हाऊस माध्यम कार्यक्रमातून निर्बंधित करण्यात आले.

यानंतर लोकातील ट्रम्प यांचे पाठीराखे सोशल मीडियावरून पत्रकारांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. पत्रकारांना धमक्मया देणे, शिविगाळ करणे हे उद्योग त्यांनी आरंभिले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या 51 टक्के मतदारानी प्रसारमाध्यमे ही अमेरिकन लोकांचे शत्रू आहेत असा कल ताज्या सर्वेक्षणात दर्शविला आहे. हा सारा प्रकार पाहून युनोच्या मानवाधिकार आयुक्तानी, ‘ट्रम्प यांचा प्रसार माध्यमांवरील हल्ला हा हेसेस प्रवृत्त करण्याच्या अगदी जवळ जाणारा  आहे’ असा जाहीर इशाराही दिला आहे.

या साऱया पार्श्वभूमीवर गुरुवारी अमेरिकेतील जवळपास शंभराहून अधिक वृत्तपत्रांच्या संपादक मंडळानी, ट्रम्प यांच्या प्रसारमाध्यमांवरील हल्ल्यांबाबत तिरस्कार व निषेध व्यक्त केला. याचबरोबर अध्यक्षांच्या या पवित्र्याविरुद्ध प्रसार माध्यमांनी संघटितपणे लढण्याची भाषाही या क्षेत्रात बोलली जाताना दिसते. याचेच प्रतिबिंब म्हणून अमेरिकेतील दिग्गज वृत्तपत्र समूहानी व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमानी गेल्या काही दिवसात ट्रम्प महाशयांच्या प्रसार माध्यम विरोधी नीतीचे वाभाडे काढण्यात आरंभ केला आहे. प्रसार माध्यमे विरुद्ध अमेरिकन अध्यक्ष हा वाद अमेरिकेत तसा नवा नाही. निक्सन यांच्या काळात तो विकोपासही गेला होता. अखेर एका अर्थाने प्रसार माध्यमानी अध्यक्ष निक्सन याना तुरुंगात पाठवून ही लढाई जिंकली. मात्र ट्रम्प काळात या लढाईस अनेक नवे आयाम प्राप्त झाले आहेत. असे असले तरीही लोकशाही देशाचा अध्यक्ष असणाऱयास प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे आवश्यक भान नसले तर काय घडते याची प्रचिती अमेरिकेतील घटनातून येते आहे. 

अनिल आजगावकर

Related posts: