|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » 2018 मध्ये सायबर सुरक्षेच्या खर्चात 12 टक्क्यांनी वाढ

2018 मध्ये सायबर सुरक्षेच्या खर्चात 12 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा आणि उत्पादने क्षेत्रात सायबर सुरक्षेसाठी 2019 मध्ये 124 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात येतील. चालू वर्षाच्या तुलनेत पुढील वर्षात सुरक्षेसाठी करण्यात येणाऱया खर्चात 8.7 टक्क्यांनी वाढ होईल असे अहवालात म्हणण्यात आले.

गार्टनर या कंपनीच्या अहवालानुसार 2018 मध्ये सायबर सुरक्षेसाठी 114 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात येतील. 2017 च्या तुलनेत यामध्ये 12.4 टक्क्यांनी वाढ होईल. सध्या व्यवसायांतील स्पर्धेत वाढ होत आहे आणि कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होत आहे यामुळे सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. युरोपियन युनियनमध्ये जीडीपीआर आणि कौशल्याचा अभाव असल्याने या क्षेत्रात मागणी वाढत आहे, असे गार्टनरचे संशोधक, संचालक सिद्धार्थ देशपांडे यांनी सांगितले.

सुरक्षेतील धोके, व्यवसायाची आवश्यकता आणि उद्योग क्षेत्रात होणारे बदल यामुळे कंपन्यांकडून या क्षेत्रात मागणी वाढत आहे. कंपन्यांकडून माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी भर देण्यात येत असल्याने सायबर सुरक्षेमध्ये 10 टक्क्यांनी वाढ होईल. ओळख आणि एक्सेस व्यवस्थापन, ओळख प्रशासन आणि व्यवस्थापन, माहिती चोरी रोखण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत डेटा चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने कंपन्यांकडून सुरक्षेवर भर देण्यात येत आहे, असे गार्टनरच्या अहवालात म्हणण्यात आले.