|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांचे निवेदन

आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांचे निवेदन 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गडहिंग्लजसह परिसरात शैक्षणिक संस्था असल्याने मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांना बस पास मध्ये सवलत मिळावी अशा मागणीचे निवेदन शनिवारी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले व गडहिंग्लज आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले.

सदर निवेदनात परगावाहून येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पण गरीब विद्यार्थ्यांना मासिक पास परवडत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे काही मुलांना शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यात विद्यार्थ्यांना वार्षिक पासमध्ये मोठया सवलती आहेत व कमी किंमतीत पास दिला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट राज्यातही परिवहन विभागाने द्यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर विनायक पोवार, प्रा. शिवाजीराव भुकेले, सुदर्शन चव्हाण, आरती गुडसे, आयेशा सोनार, माधूरी भोसले, सोनाली भोसले, कोमल भादवणकर, अस्मिता आरभावी, स्वाती कवळीकट्टीकर, सुप्रिया पाटील, आस्मिता तेरणी, सुजाता तोडकर, श्रृती तेली यांच्यासह आदी विद्यार्थ्यांच्या  सहया आहेत.