|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » चला हवा येऊ द्या नाबाद 400

चला हवा येऊ द्या नाबाद 400 

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडेतीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने 400 भाग पूर्ण केले आहेत.

 डॉ. निलेश साबळे पॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला चला हवा येऊ द्या हा छोटय़ा पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता छोटय़ा पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे. चला हवा येऊ द्याची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसफष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे.  यानिमित्ताने प्रेक्षक 20 ते 24 ऑगस्टपर्यंत चला हवा येऊ द्या हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. 400 भागांच्या या धमाल मस्तीमध्ये रंगलेल्या सेलिब्रेशनमध्ये सिनेसफष्टीतील अनेक कलाकार देखील सहभागी झाले. चित्रपटसफष्टीतील 3 नावाजलेले जाधव म्हणजेच दिग्दर्शक संजय जाधव, रवी जाधव आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव हे त्यांच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने सर्वांना थिरकायला लावणार आहेत. सिनेसफष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने श्रीदेवीला मानवंदना देत हवाहवाईवर परफॉर्म करणार आहे. तसच सर्वांना हसवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हसवा फसवी मधील काही पात्र प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. थुकरट वाडीतील विनोदवीर देखील प्रेक्षकांसाठी हास्य कलाकृती सादर करणार आहेत. 20 ते 24 ऑगस्टदरम्यान रात्री 9.30 वाजता हे भाग प्रसारित होणार आहेत

Related posts: