|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना

मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना 

मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आज अनेक संघटनांनी पावले उचलली आहेत. मराठी चित्रपटसफष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली तरी वितरण निर्बंधनामुळे हे चित्रपट हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांचा फिल्मीदेश हा अनोखा उपक्रम जगभर मोठय़ा प्रमाणात राबवला जाणार आहे.

  मराठी तसेच हिंदी चित्रपटसफष्टीत निर्मिती आणि वितरणक्षेत्रात नितीन केणी यांचे नाव मोठे आहे. त्यांनी गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपटासाठी आणि सैराट, कटय़ार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. नितीन केणी झी स्टुडिओचे माजी सीईओ असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी झी स्टुडिओला नव्या उंचीवर नेण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. याप्रकारे मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱया नितीन केणी यांचा फिल्मीदेश हा उपक्रम मराठी चित्रपटांसाठी भावी काळात फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत, विदेशातील स्थानिक मराठी प्रेक्षकांच्या नजीकच्या चित्रपटागफहात मराठी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी जागतिकस्तरीय ‘बफहन्महाराष्ट्र मंडळ’चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. याद्वारे मराठी चित्रपट जगभरातील प्रसिद्ध चित्रपटगफहात दाखवले जाणार असून, चित्रपट वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा फिल्मीदेश हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा  ठरणार आहे.

 फिल्मीदेश या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना, आज मराठी चित्रपटसफष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. प्रादेशिक भाषिक चित्रपटांमध्ये मराठीचा दर्जा वाढत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मराठी चित्रपटांना मोठी मागणी आहे. भारताबाहेरील या सर्व मराठी आणि अमराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहता यावे यासाठी मनीष वशिष्ट यांच्या साथीने फिल्मीदेश ही संकल्पना राबवली असल्याचे नितीन केणी यांनी सांगितले. तसेच मर्यादित वितरणामुळे मराठी चित्रपटांना विदेशातून उत्पन्न मिळविण्याची संधी आतापर्यंत मिळत नव्हती. पण, या उपक्रमाद्वारे निर्मात्यांना कमाईचे अधिक स्त्राsत उपलब्ध होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.