|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » एटीएम सुरक्षेसाठी नवीन नियमावली

एटीएम सुरक्षेसाठी नवीन नियमावली 

नवी दिल्ली :

बँकाच्या एटीएममध्ये नोटा भरण्यासाठी लवकरच नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. यात कोणत्याही एटीएममध्ये रात्री 9 नंतर नोटांचा भरणा करण्यात rयेणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील वेळा वेगवेगळय़ा ठेवण्यात येणार असून यात ग्रामीण भागासाठी सायंकाळी 6 वाजताची वेळ ठेवली जाणार असून शहराकरिता 9 वाजता आणि नक्षली प्रदेशात दुपारी 4 वाजताची वेळ निश्चत करयात येऊन या नियमावलीची अंमलबजावणी 8 फेबुवारी 2019 पासून लागू करण्यात येणार असल्याचे आदी सूचना गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.  सध्या नोटा भरणा करणाऱया वाहनावर हल्ला करणे, एटीएमची वाढती लूट असे प्रकार होण्याला आळा बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Related posts: