|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी

संतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

छत्रपती शिवाजी स्टेडियममधील बिभिषण पाटील व्यायामशाळा येथे नुकत्याच नवोदितांसाठी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिन-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत फुलेवाडीतील के-वन जीमच्या संतोष पाटील याने स्वातंत्र्यदिन-श्रीचा बहुमान पटकावला. तसेच बेस्ट पोझर म्हणून शाहूपुरी जिमच्या अवधूत निगडे याला तर मोस्ट इंम्प्रुव्हड म्हणून उचगाव जिमच्या रविराज पाटील याला गौरविण्यात आला. बिभिषण पाटील व्यायामशाळेने स्पर्धेचे आयोजन केले होते.

   स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धेत जिह्यातील शंभरावर शरीरसौष्ठवपटूंनी 55, 60, 65, 70 किलो वजनाखालील व 75 किलो वजनावरील आदी पाच गटातून सहभाग घेतला होता. सचिन ढणाल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्पर्धा संयोजक बिभिषण पाटील, भरत पाटील, दिलीप कदम, माणिक पाटील, विनय कळंत्रे, गणेश कदम, डॉ. के. एन. पाटील आदी उपस्थित हेते.

   विविध वजन गटात अनुक्रमे यश मिळलेले शरीरसौष्ठवपटू असे :

55 किलो-अवधुत निगडे (शाहूपुरी जिम), अवधूत पाटील (पाडळी जिम), आकाश भट (दुधाळी जिम), गणेश कांबळे (शाहूपुरी जिम), राजवर्धन सर्नोबंद शिवाजी स्टेडियम जिम.

55 ते 60 किलो-रविराज पाटील (उचगाव जिम), पांडूरंग भोसले (गगनबावडा जिम), रितेश येळावडेकर (दुधाळी जिम), पंकज धनवडे (पार्थ जिम), यश पत्रावळे (शाहूपुरी जिम).

60 ते 65 किलो-रविराज काळे (शिवाजी स्टेडियम जिम), दर्शन झेंडे (केवन जिम), धीरज जाधव (परफेक्ट जिम), सुरज सूर्यवंशी (पार्थ जिम), पवन ढाले (शिवाजी स्टेडियम जिम).

65 ते 70 किलो-संतोष पाटील (केवन जिम), सौरभ पाटील (केवन), अमित पाटील (शाहूपुरी जिम), पृथ्वीराज पाटील (परफेक्ट जिम), सुनील दुग्गी (शिवाजी स्टेडियम जिम)

70 ते 75 किलो-पंडीत पाटील (म्हालसवडे जिम), युवराज भोरे (शिवाजी स्टेडियम जिम), सुरज जाधव (सिटी फिटनेस), पराग कदम (शिवाजी स्टेडियम जिम), सौरभ पोवार (शाहूपुरी जिम).