|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रा.पं.ची परवानगी न घेताच काजू कारखान्याचे काम

ग्रा.पं.ची परवानगी न घेताच काजू कारखान्याचे काम 

वझरे ग्रामस्थांचा व्यवस्थापनाला घेराव

वार्ताहर / दोडामार्ग:

वझरे येथील एका काजू कारखान्याने कारखान्याचे काम अर्धवट असताना ग्रामपंचायतीची परवानगी न घेता गेल्या दोन महिन्यापासून काम सुरू केल्याने वझरे सरपंच लक्ष्मण गवस व अन्य ग्रामस्थांनी काजू कारखान्याला घेराव घातला. ग्रा. पं. च्या परवानगीशिवाय काम कसे सुरू केले? या बाबत जाब विचारला. कारखान्याचे काम दोन महिन्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ग्रा. पं. ची परवानगी घेणार असल्याचे खोटे पत्र ग्रामपंचायतीला देऊन ग्रा. पं. ची दिशाभूल केल्याचा आरोप वझरे सरपंच व
ग्रामस्थांनी केला.

वझरे येथे एका गोव्यातील काजू कारखाना कंपनीने आपल्या कारखान्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. ते काम व लाईट जोडणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही ग्रा. पं. ची परवानगी घेणार, असे पत्र वझरे ग्रामपंचायतीला दिले. मात्र, दिलेले पत्र हे खोटे असल्याचे सरपंच गवस यांनी सांगत या कारखान्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू केले आहे. वीज कनेक्शनही जोडण्यात आले आहे. असे असता ग्रामपंचायतीची दिशाभूल करीत काजू कारखान्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामपंचायतीला खोटे पत्र

यावेळी सरपंच गवस म्हणाले की, कारखान्याचे काम अर्धवट असल्याने ते पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही परवानगी घेऊ, असे पत्र ग्रा. पं. ला देण्यात आले. मात्र, कारखान्याचे काम अर्धवट असताना ग्रा. पं. ला अंधारात ठेवून काम सुरू करण्यात आले असल्याने सरपंच गवस व ग्रामस्थांनी सांगितले.

Related posts: