|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दिव्यांग बांधवांसाठी अनेक मदतीचे हात उभे राहतील- मधुकर रामाणे

दिव्यांग बांधवांसाठी अनेक मदतीचे हात उभे राहतील- मधुकर रामाणे 

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थाचा उपक्रम

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 ज्ञानप्रबोधिनी अंधशाळा अत्यंत समर्पण कार्यरत असणारी संस्था असून, संस्थेच्या पाठीमागे दातृत्वाचे अनेक हात निश्चित उभे राहतील, असे प्रतिपादन हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामाणे यांनी व्यक्त केले. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित ज्ञानप्रबोधिनी अंधशाळेतील विद्यार्थ्याना भोजनदान करण्यात आले. यावेळी रामाणे बोलत होते.

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्यावतीने मिरजकर तिकटी येथील ज्ञानप्रबोधिनी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. या उपक्रमाबद्दल ज्ञातप्रबोधिनी अंधशाळाचे अध्यक्ष प्रकाश बोंद्रे यांनी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे कौतुक केले. हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर, रामेश्वर पतकी, पद्माकर कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहूल चौधरी, फत्तेसिंह सावंत, सुरेश पाटील, गुरूदत्त म्हाडगूत, अंकुश देशपांडे, मुसा शेख, प्रताप जाधव, बाबा सावंत, श्रीकांत मनोळे आदी उपस्थित होते.

 

Related posts: