|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विलास पाटील यांचा संजय मामा शिंदे यांच्या गटात प्रवेश

विलास पाटील यांचा संजय मामा शिंदे यांच्या गटात प्रवेश 

जेउर / वार्ताहर

जेऊर येथील आमदार नारायण (आबा) पाटील यांचे चुलत बंधू पंचायत समिती चे माजी सदस्या विलास पाटील यांनी 20 ऑगस्ट रोजी जेऊर येथे आपल्या सर्व कार्यकर्त्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. जेऊर येथे कार्यक्रम घेण्यात आला असून, संजय शिंदे यांची घोडय़ावर बसऊन जेऊर गावात मिरवणूक काढण्यात आली. हजारोच्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत वामन बदे, तात्यासाहेब मस्कर, तानाजी झोळ, कण्हयालाल देवी, उपस्थित होते. विलास पाटील यांच्या गावी सदर कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे संजय शिंदे यांच्या समवेत विलास पाटील यांचा एकाच भव्य अश्या हाराने स्वागत केले गेले.

यावेळी कार्यक्रमात संजय शिंदे म्हणाले, करमाळा तालुका गत विधानसभा निवडणुकीत आपण नवखे उमेदवार असून सुद्धा थोडय़ा मतानेच पराभूत झालो त्यानंतर आपण येथे विकासाचे राजकारण चालू केले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन कोटय़ावधीचा निधी आतापर्यंत दिला असून अजूनही तो देण्यास मी तत्पर आहे. तालुक्यात विरोधकांकडून भावनिक राजकारण केले जात असून  किती दिवस भावनिक राजकारण करणार असा सवाल त्यानी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर गदिया यांनी केले.

आपण कार्य पुढे चालू ठेवू….

तरी मी संत नाही करमाळयाच्या विकासासाठी मी सतत पुढे सरसावला असे त्या वेळी संजय मामा म्हणाले आणि यापुढे करमाळयात कसलीही दादागिरीचे राजकारणाला ना जुमानता आपण आपले कार्य पुढे चालू ठेऊ, असे ते म्हणाले.

 

Related posts: