|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » अतिवृष्टीमुळे केरळचे 20  हजार कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे केरळचे 20  हजार कोटींचे नुकसान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे येथील नुकसानीचा आकडा 20 हजार कोटीच्या घरात पोहचला आहे. असा अंदाज असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) ने वर्तविला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक अंदाजानुसार येथील शेतकऱयांचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

याचबरोबर एक लाख गायी, एक लाख शेळय़ा, एक लाख डुकरं आणि चार लाख कोंबडय़ा पुरात वाहुन गेल्याची भिती आहे. जवळपास तीन लाख शेतकऱयांना या महापूराचा फटका बसला आहे. 14 जिल्हय़ातील 1 लाख 14 हजार एकरावरील पिक, फळबागा देखिल नष्ट झाल्या आहेत.

 

 

 

Related posts: