|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्रॉडवर दंडात्मक कारवाई

ब्रॉडवर दंडात्मक कारवाई 

वृत्तसंस्था/ नॉटिंगहम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सामना मानधनातील 15 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे. येथे झालेल्या तिसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी त्याने आयसीसी आचारसंहितेचा भंग केल्याने त्याच्यावर आयसीसीने ही कारवाई केली आहे. याशिवाय त्याच्या नावावर एक डिमेरिट गुणही जमा झाला आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये सुधारित आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यानुसार ब्रॉडकडून घडलेला हा पहिलाच अपराध आहे. रविवारी भारताच्या पहिल्या डावातील 92 व्या षटकावेळी ऋषभ पंतला बाद केल्यानंतर ब्रॉडने त्याच्याकडे जात आक्रमक भाषेत बोलून असभ्य हावभाव केले. त्याच्या या कृतीने पंत प्रक्षोभित होण्याची शक्मयता होती. या कारणामुळेच ब्रॉडवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ब्रॉडने अपराध व सामनाधिकारी जेफ क्रो यांनी दिलेली शिक्षा मान्य केली असल्याने औपचारिक सुनावणी घेतली गेली नाही.