|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत चौथी कसोटी जिंकण्याची शक्यता : हरभजन

भारत चौथी कसोटी जिंकण्याची शक्यता : हरभजन 

वृत्तसंस्था /नॉटिंगहॅम :

कसोटी मालिकेतील साऊथम्पटन येथे 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱया इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या सामन्यात भारताला विजयाची निश्चितच संधी असल्याचे वैयक्तिक मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडने पहिल्या सलग दोन कसोटी जिंकून आघाडी घेतली होती पण त्यानंतर नॉटिंगहॅमच्या तिसऱया कसोटीत भारताने दर्जेदार कामगिरी करत इंग्लंडचा 203 धावांना दणदणीत पराभव केला. या विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चित वाढला असून त्याचा लाभ या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात मिळू शकेल, असे हरभजनने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या विजयामुळे कोहलीच्या भारतीय संघाने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. साऊथम्पटनची खेळपट्टी तसेच वातावरण भारतीय संघाला लाभदायक ठरेल, असेही हरभजन म्हणाला. या चौथ्या कसोटीत खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरू शकेल, त्यामुळे कदाचित दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याची शक्यता त्याने वर्तविली आहे.

लॉर्डस्च्या कसोटीबाबत बोलताना हरभजन म्हणाला की, लॉर्डस्मधील वातावरण अत्यंत खराब होते. या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनाही चांगलेच झगडावे लागले. पण भारताला नाशिबाची साथ नव्हती. लॉर्डस् आणि बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात खूप तफावत दिसून आली. बर्मिंगहॅमच्या कसोटीत खराब वातावरणातही भारतीय फलंदाजांनी बऱयापैकी धावा जमविल्या होत्या, असे हरभजन म्हणाला. अशा खराब वातावरणात भारताने 350 धावांपर्यंत मजल मारली असती तर त्या सामन्याचे चित्र वेगळे पाहावयास मिळविले असते. इंग्लंडची फलंदाजी भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसमोर कमकुवत वाटल्याचे हरभजनने म्हटले आहे.

Related posts: