|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्वरी येथे अस्थिकलशाचे आगमन

पर्वरी येथे अस्थिकलशाचे आगमन 

पर्वरी :

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे पर्वरी येथे आज सकाळी 8 वाजता आगमन झाले. मळा पणजी येथे काल अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता तेथून उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, पर्वरी मतदारसंघ भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर आदी कार्यकर्त्यांसह अस्थिकलशाचे आगमन पर्वरी येथील पीडीए कॉलनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. पर्वरी येथे अस्थिकलश पोचताच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते तसेच स्थानिक लोकांनी अस्थिकलशाचे अटलजी अमर रहे च्या घोषणा देऊन स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते विनयकुमार मंत्रवादी, कुंदा चोडणकर, गोविंद पर्वतकर, राजकुमार देसाई, गुरुप्रसाद पावसकर, दिलीप परुळेकर आदी नेत्यांनी स्वागत करुन कलशावर पुष्पहार व फुले अर्पण केली. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते किशोर अस्नोडकर, अजय गोवेकर, कान्होबा नाईक, मंगेश कोटणीश, हरी हरमलकर, वैभव लोटलीकर आदी अनेक कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे पूष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पिळर्ण, बेती वेरे, बिठ्ठोण, एकोशी, सुकुर, सालई पोबुर्फा इत्यादी गावातील नागरिकांनी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी अस्थिकलाशाचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली. पर्वरी येथील पूजनानंतर अस्थिकलश कळंगूट मतदार संघाकडे घेऊन जाण्यात आला. अटलजींच्या पवित्र अस्थिकलशाचे सर्व नागरिकांना दर्शन व्हावे म्हणून संपूर्ण उत्तर गोव्यात फिरुन उद्या संध्याकाळी केप्टन ओफ पोर्ट जेटी पणजी येथे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याहस्ते विसर्जन होणार आहे.

Related posts: