|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तीघे ताब्यात

गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तीघे ताब्यात 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रत्यन झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला.

अंधश्रद्धेतून मुलीचा बळी देण्यासाठी रांजणगावात सर्व तयारी करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी अचानक छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. इमाम पठाण आणि बाळू शिंदे अशी यातील दोन आरोपींची नावं आहेत.ही पूजा करण्यासाठी एकाला 1 लाख 68 हजार रुपये देण्यात येणार होते, अशी माहितीही समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नग्न पूजा आणि बालिकेचा बळी दिला जाणार होता. मात्र, अंनिस आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळं पुढील अनर्थ टळला आहे.