|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, 31प्रवासी जखमी

रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, 31प्रवासी जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रायगड जिलह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस उलटून झालेल्या अपघतात 31 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली असतान हा अपघात झाला.

शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस पलटल्याने 31 प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

 

 

Related posts: