|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » एशियन गेम्स : स्क्वॅशमध्ये भारताने खाते उघडले , दिपीका पल्लकिलला कांस्य पदक

एशियन गेम्स : स्क्वॅशमध्ये भारताने खाते उघडले , दिपीका पल्लकिलला कांस्य पदक 

ऑनलाइन टीम/ नवी दिल्ली :

आशियाई खेळांच्या सातव्या दिवशी भारताने स्क्वॅशमध्ये आपले खाते उघडत कांस्य पदकाची कमाई केली आहे.भारताच्या दिपीका पल्लकिलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल ऍन डेव्हिडकडून पराभव पत्करावा लागला.त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या निकोल ऍन डेव्हिडने दिपीकावर 7-11, 9-11, 6-11 अशा 3 सरळ सेट्समध्ये मात केली. दुसरीकडे भारताच्या जोशना चिनप्पालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमने जोशनाचा पराभव केला.

याचबरोबर ऍथलेटिक्समध्ये भारताच्या मोहम्मद अनसने 400 मी. शर्यतीमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसाच्या खेळात भारताच्या खात्यात किती पदकांची भर पडतेय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.