|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आयएएस चौधरी यांनी दिला राजीनामा, भाजपप्रवेश करणार

आयएएस चौधरी यांनी दिला राजीनामा, भाजपप्रवेश करणार 

रायपूर

 छत्तीसगढची राजधानी रायपूरचे जिल्हाधिकारी ओ.पी. चौधरी यांनी स्वतःच्या पद आणि सेवेचा राजीनामा दिला आहे. याचदरम्यान चौधरी हे भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चेला बळ मिळाले आहे. छत्तीसगढमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. चौधरी यांनी पक्षात प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे भाजपने म्हटले आहे. नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्हय़ात शिक्षणक्षेत्रात घडवून आणलेल्या क्रांतिकारी बदलांसाठी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. रायगढच्या खर्सिया मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.  हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. चौधरी हे अघरिया समुदायाचे असून त्याचे रायगढ जिल्हय़ात मोठे वर्चस्व आहे.

Related posts: