|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर हल्ल्याचा प्रयत्न

पत्नीच्या प्रियकराकडून पतीवर हल्ल्याचा प्रयत्न 

राणी चन्नम्मानगर येथील घटना, प्रियकराला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

पत्नीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱया पतीवर तिच्या प्रियकराने चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी दुपारी राणी चन्नम्मानगर येथे ही घटना घडली. उद्यमबाग पोलिसांनी सोमवारपेठ, टिळकवाडी येथील एका तरुणाला अटक केली आहे.

झेवीयर पिंटो (वय 23, रा. सोमवारपेठ, टिळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. शनिवारी दुपारी हातात चाकु घेवून झेवीयर राणी चन्नम्मानगर पहिला स्टेज येथील एका युवकावर हल्ला करण्यासाठी पोहोचला होता. त्याचा अंदाज येताच त्या युवकाने आपल्या घरात शिरुन दरवाजा बंद करुन घेतला.

यासंबंधी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, झेवीयर हा गेल्या चार महिन्यांपासून चन्नम्मानगर येथील एका 30 वषीय विवाहितेच्या प्रेमात पडला होता. तिला सहा महिन्याचे बाळही आहे. तिचा पती एका खासगी दवाखान्यात काम करतो. पती कामावर गेला की झेवीयर त्यांच्या घरी यायचा. त्यानंतर या दोघांचे चाळे चालायचे.

या संबंधी पतीला कुणकुण लागताच पतीने आपल्या पत्नीला समज दिली. मात्र तिने पतीचे ऐकले नाही म्हणून आपल्या सासू, सासऱयांनाही त्याने ही माहिती दिली. मात्र त्यांनी आपल्या मुलीला समज देण्याऐवजी जावयाचीच चूक आहे, असा आरोप केला. त्यामुळे वैतागलेल्या युवकाने झेवीयरला गाठून माझ्या घरी येवू नकोस असे सांगितले.

सगळय़ांना सांगूनही त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. अखेर त्या युवकाने आपल्या घरी गुप्त कॅमेरे लावले. या कॅमेऱयात त्याची पत्नी व झेवीयर यांचे अश्लिल चाळे कैद झाल्यानंतर या युवकाने पुन्हा आपल्या सासु सासऱयांकडे तक्रार केली. त्यांना सीसीटीव्हीचे फुटेज दाखविले. तरीही सासू, सासऱयांनी त्या युवकालाच दोषी मानले. शेवटचा उपाय म्हणून 20 ऑगस्ट रोजी झेवीयरला गाठून तुझे चाळे कॅमेऱयात कैद झाले आहेत. तु आता तरी घरी यायचे बंद केला नाहीस तर तुझ्या विरुध्द पोलिसांत फिर्याद दाखल करतो, अशी धमकी दिली. त्यावेळी तिसऱया रेल्वेगेटजवळ त्या युवकाला बेदम मारहाण केली होती.

21 ऑगस्ट रोजी झेवीयर विरुध्द उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले होते. आता आपली पत्नी व झेवीयर यांच्यात झालेले संभाषण व कॅमेऱयात कैद झालेले फुटेज हा युवक पोलिसांकडे सोपविणार हे लक्षात येताच झेवीयरने शनिवारी दुपारी हातात चाकु घेवून संबंधित युवकावर हल्ला करण्यासाठी त्याचे घर गाठले. त्याची कल्पना येताच स्वतःचा बचाव करुन घेवून त्या युवकाने उद्यमबाग पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांनी झेवीयरला अटक केली आहे.

Related posts: