|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इराणमध्ये भूकंपाचे धक्के, 2 जणांचा झाला मृत्यू

इराणमध्ये भूकंपाचे धक्के, 2 जणांचा झाला मृत्यू 

तेहरान

 इराणचा कर्मानशाह प्रांत रविवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांना जीव गमवावा लागला असून 100 जण जखमी झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे शेकडो इमारतींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाचे केंद्र तजेहाबाद शहरापासून 9 किलोमीटर तर जावनरुड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर होते. दोन्ही शहरे इराक सीमेनजीक आहेत. भूकंपाचे केंद्र सुमारे 10 किलोमीटर जमिनीत खोलवर होते. भूकंपग्रस्त क्षेत्रात 5 बचावपथके पाठविण्यात आल्याची माहिती इराणच्या आपत्कालीन तसेच नैसर्गिक आपत्ती संस्थेने दिली आहे. इराकची राजधानी बगदाद येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बगदाद हे शहर इराणच्या सीमेपासून सुमारे 342 किलोमीटर अंतरावर आहे.

 

Related posts: