|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » स्फोटक प्रकरण ; जालन्यातील फार्म हाऊसवर एटीएसची झडती

स्फोटक प्रकरण ; जालन्यातील फार्म हाऊसवर एटीएसची झडती 

ऑनलाईन टीम / जालना :

नालासोपाऱयातील स्फोटकांची जप्ती आणि वैभव राऊतसह त्याच्या सहकाऱयांच्या अटकेनंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्य रॅकेटची पाळेमुळे सुरूवात केलेली आहे. श्रीकांन पांगारकरकडून मिळालेल्या माहिती आधारवर आज दहशतवादविरोधी पथकाने जालन्यापासून 10 किमी अंतववरील रेवगावातील जालन्याचा माजी नगरसेवक खूशालसिंग ठाकूरच्या फार्महाऊसवर धाड टाकली.याची फॉर्महाऊसवर पांगारकरने बॉम्बनिर्मिती ,पिस्तूल चालवण्याचा सराव केल्याची माहिती चौकशीत अधिकाऱयांना दिली होती.

काल दुपारी पावणेतीन वाजता औरंगाबादेतून दहशतवाद विरोधी पथकाच्या सुमारे 50 अधिकारी व कर्मचाऱयांची 5 वाहने या मोहिमेवर रवाना झाली होती. त्यांच्यासोबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेसह बॉम्बशोधक -नाशक पाथक आणि श्वानपथकातील गौरी होती.