|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » देशभावना जागृत झाल्यास लोकशाही प्रगल्भ होईल; किरण ठाकूर यांचे पुण्यात प्रतिपादन

देशभावना जागृत झाल्यास लोकशाही प्रगल्भ होईल; किरण ठाकूर यांचे पुण्यात प्रतिपादन 

पुणे / प्रतिनिधी :

आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवे आणि हा तिढा सोडवला पाहीजे. भारताची लोकसंख्या ही समस्या समजले जात असले तरी भविष्यात ही जास्त लोकसंख्या देशाला तारेल. मात्र प्रत्येकजण शिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत व्हायला हवा. इन्मक टॅक्स काढा, देश पाचपटीने पुढे जाईल. राजकारण आज समाजकारणासाठी नव्हे, तर पैसे कमविण्याचा उद्योग झाला आहे. राजकारणी करोडपती आहेत. देशभावना जागृत झाली, तर लोकशाही प्रगल्भ होईल. एकटे मोदी बदलून जालणार नाही, तर प्रत्येकाने बदलायला हवे, असे उद्गार ‘तरूण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी काढले. ते पुण्यात शनिवार कट्टा आयोजित ‘एक कट्टा महाराष्ट्रासाठी’ या चर्चासत्रात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मत मांडताना भारतीय लष्कर अधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर म्हणाले की, माझ्या कंपनीत सर्व जातीधर्माची सैनिक होते. आईवडीलांना मुलांना नाही म्हणण्याची हिंमत नाही. इसजरायलमधील प्रत्येक नागरिकाप्रमाणे देशभावना जीन्समध्ये उतरायला हवी.

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तरूणाईचं मत जाणून घेण्यासाठी ‘एक कट्टा महाराष्ट्र’ हे खुले आणि अनौपचारीक चर्चासत्र पुण्यात आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. विनय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्र भडकविण्याचे प्रयत्न लांच्छनास्पद, आरक्षणची गरज आहे का? असा प्रश्न विचारून चर्चेला सुरूवात करून दिली. यावर उद्योगपती संदिप माहिते-पाटील, चित्रपट-नाटय़ व जाहिरात क्षेत्राशी निगडित असलेले रोहन मंकणी, राजकीय विश्लेषक चिंतन थोरात, जनसंपर्क आणि सामाजिक कार्यकर्त्या नेहा जोशी, कायदेतज्ञ मनीष पाडेकर यांनी प्रामुख्याने आपली मते नोंदवली.

यामध्ये नेहा जोशी यांनी सोशल मीडिया अधिक कारणीभूत ठरववत सोशल मीडियावर आपल्याच देशाची प्रतिमा आपण बिघडतोय. मोबाईलमधून सर्व समस्या सुरु होतायत, असे मत व्यक्त केले. मनीष पाडेकर यांनीही फेसबुकचा बॉम्ब आणि व्हॉटस् ऍपची बंदूक लोक घेऊन असल्याचे सांगत घरातल्या मुलांवर अंकुश नसल्याचे सांगत राजकारणी त्यांना भडकवत असल्याचे मत मांडले.

तर चिंतन थोरात यांनी प्रत्येक न्यूज आज चटपटीत होऊन सांगत आज पत्रकारांतही जातीयवाद शिरतोय. जसे पत्रकारितेचे तसेच राजकारणाचे अधःपतन झाले आहे. समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी पक्ष समाजविघातक कारवाया घडवत असल्याचे सांगितले. संदिप मोहिते-पाटील यांनी आपण सीरियाच्या मार्गावर असल्याचे मत नोंदवले. तर रोहन मंकणी यांनी आज शिक्षण, आरक्षण हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे नागरिकशास्त्र शिक्षणात अग्रक्रमाने शिकविण्याची गरज व्यक्त केली.

चर्चासत्रात एकूण सोशल मिडिया, नोटबंदी, राजकारण, आरक्षण, शिक्षण, आजचा युवा, लोकसंख्या असे विविध विषय हाताळले. शेवटी आज देशात समाज प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले. चर्चासत्राच्या सुरूवातीला दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

 

 

 

Related posts: