|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नागेशी सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

नागेशी सप्ताहाला उत्साहात प्रारंभ 

वार्ताहर/ मडकई

नागेशी बांदोडा येथील नागेश संस्थानच्या वार्षीक सार्वजनीक भजनी सप्ताहाला काल सोमवार पासून प्रारंभ झाला. सात दिवस चालणाऱया या सप्ताहाचे यंदा हे 66 वे वर्ष आहे. दुपारी 12.30 वा. समई प्रज्जलीत करुन ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात भाविकांनी भजनाला सुरुवात केली.

 प्रसाद गांवकर यांनी पुरोहित प्रसाद जोशी यांच्या अधिपत्याखाली धार्मिक विधी पार पाडले. नंतर सामुहित गाऱहाणे घालण्यात आले. गायक कलाकार प्रसाद वळवईकर, श्रीपाद नाईक गावणेकर, यांनी भजनाला सुरुवात केली. त्यांना हार्मोनियमवर विनायक च्यारी तर पखवाजवर विष्णू नाईक व प्रमोद हरमलकर यांनी साथसंगत केली. यावेळी दिलीप ढवळीकर, मिथील ढवळीकर, वंदेश तिळवे, अतुल नाईक, रमानाथ नाईक, नरेंद्र नाईक, मनोज बांदोडकर, नागेश देवस्थानचे पदाधिकारी, सप्ताह समितीचे पदाधिकारी, बांदोडा व कवळे पंचायतीचे सरपंच, आजी माजी पंचसदस्य, तसेच अन्य ग्रामस्थ व भक्तगण मोठय़ासंखेने उपस्थित होते. सप्ताहाच्या सातही दिवस नामवंत भजनी कलाकारांची भजने होणार आहेत.

 रात्री पौराणिक कथेवर आधारीत चित्ररथ देखाव्यासह दिंडी मिरवणूक काढण्यात आली. पुढील सातही दिवस अशाचप्रकारे मिरवणूक काढण्यात येणार आहे. सातव्या दिवशी दही हंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल